MKCL & MCED मान्यताप्राप्त नं 1 संगणक प्रशिक्षण संस्थेत MS-CIT, Tally ERP 9, D.C.T.Ed(IT) कोर्सला प्रवेश देणे चालू आहे

Sunday, 12 November 2017

महालाभार्थी वेबपोर्टल

शासनाच्या विविध योजनांच्या लाभांची माहिती आता व्यक्तिअनुरुप स्वरूपात
माननीय मुख्यमंत्री श्री. देवेंद्रजी फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र शासनाच्या मुख्यमंत्री कार्यालयाने आजपर्यंत अनेक लोकउपयुक्त उपक्रम यशस्वीपणे व पारदर्शीपणे राबविले आहेत. त्यांच्या डिजिटल महाराष्ट्र या व्हिजनअंतर्गतनागरिकांना वैयक्तिकरित्या मदत करणाऱ्या ‘महालाभार्थी’ या एका पथदर्शी उपक्रमाचे मुख्यमंत्री कार्यालय आणि महाराष्ट्र ज्ञान महामंडळ अर्थात MKCL यांच्या संयुक्त विद्यमाने आज मा. मुख्यमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण केले गेले.
       शासनाच्या विविध कल्याणकारी योजनांपैकी नागरिक कोणत्या योजनांना पात्र होऊ शकतात याची माहिती नागरिकांना व्यक्तिअनुरुप स्वरूपात उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने ‘एमकेसीएल’ च्या मदतीने ‘महालाभार्थी’ या संकेतस्थळाची निर्मिती करण्यात आलेली आहे.
       यासुविधेचा लाभ घेण्यासाठी नागरिकांनी प्रथम cmo.maharashtra.gov.in किंवा www.mahalabharthi.in या संकेतस्थळावरील ‘महालाभार्थी’ लोगोवर क्लिक करून ‘महालाभार्थी’ या पोर्टलवर जावे. तेथे आवश्यक ती माहिती भरून प्रथम नोंदणी करून  लॉगीन करावे. आपली थोडक्यात माहिती भरावी. त्या माहितीच्या आधारे ज्याला नागरिक पात्र होऊ शकतात केवळ अशाच निवडक योजनांची माहिती हे पोर्टल देणार आहे.
#vksborde
 

No comments:

Post a Comment