गीता मद्धे म्हंटलं आहे कि - ”ज्ञानात ऋते न मुक्ति” अर्थात् ज्ञाना शिवाय मुक्ति सम्भव नही । ज्ञान मिळविण्याचे मुख्यत: दोन मार्ग आहे सत्संगति आणि स्वाध्याय. आज ज्या पद्धतीने नवीन पिढी सोशल मीडियाच्या आहारी गेली आहेत त्यामुळे येणार्या काळात त्यांचे फार मोठे बौद्धिक नुकसान होणार आहे आणि होत आहे. पुस्तक वाचनामुळे होणारे फायद्दे आणि त्यामधून मिळणारी Positive ऊर्जा याचे महत्व त्यांना पटवून सांगण्याची अत्यंत अवशक्ता निर्माण झालेली आहे. विद्यार्थ्यांना वाचनाची गोडी निर्माण व्हावी या उद्देशाने आमचे मित्र संकल्प एजुकेशन औरंगाबाद चे संचालक श्री राहुल मिसाळ यांनी न्यू हायस्कूल भोकरदन शाळेला काही चांगली पुस्तके भेट दिली.
न्यू हायस्कूल भोकरदन चे मुख्याध्यापक श्री भालेराव सर यांना पुस्तकांची भेट देतांना आयकॉन कॉम्प्युटर्स चे संचालक विकास पाटील बोर्डे, याप्रसंगी उपस्थित भोकरदन पोलिस ठाण्याचे निरीक्षक श्री रेंगे साहेब, श्री राहुल मिसाळ व शिक्षक वृंद
No comments:
Post a Comment