MKCL & MCED मान्यताप्राप्त नं 1 संगणक प्रशिक्षण संस्थेत MS-CIT, Tally ERP 9, D.C.T.Ed(IT) कोर्सला प्रवेश देणे चालू आहे

Thursday, 16 November 2017

Icon's Tricks & Tips

धीतरी उपयोगी पडणार्‍या छोट्या-छोट्या गोष्टी

छोट्या - छोट्या गोष्टी कधी-कधी फार उपयोगी पडतात. एखाद्या गोष्टीचे महत्व त्या गोष्टीची जेव्हा गरज पडते त्याच वेळी कळते. अशाच काही क्वचित उपयोगी पडणार्‍या छोट्या-छोट्या  गोष्टी दिल्या आहेत.
१) बर्‍याच वेळा आपण चुकून चुकीच्या बटनावर किल्क करतो उदा. वर्डमध्ये काम करीत असलेली फाईल बंद करताना 'Yes' एवजी 'No' ह्या बटनावर क्लिक करतो. अशाप्रकारे जर कधी तुम्ही चुकून चुकीच्या बटणावर क्लिक केलात तर माऊसचे बटन न सोडता त्या दाबलेल्या अवस्थेमध्येच माऊस त्या बटनापासून दूर न्यायचा व बटन सोसायचे.
२) एखादी फाईल डिलीट केल्यावर ती 'रिसायकल बिन' ( Recylce Bin ) मध्ये जाते व तीला कायमची डिलीट करायची असल्यास आपण 'रिसायकल बिन' मध्ये जाऊन ती फाईल डिलीट करतो. त्याएवजी एखाद्या वेळेस जर एखादी फाईल कायमची डिलीट करायची असल्यास कि-बोर्ड वरील 'Shift' चे बटण दाबून 'Delete' चे बटन दाबावे. अशा वेळी ती फाईल कायमची डिलीट करायची आहे का असे कॉम्प्युटरवर विचारतो व ती फाईल 'रिसायकल बिन' मध्ये न टाकता कायमची कॉम्प्युटरमधुन नष्ट करतो.
३) एखादी CD कॉम्प्युटरमध्ये टाकली की ती आपोआप सुरु होते. गाण्यांच्या CD बाबत असे सतत घडते. अशा वेळी ती अथवा इतर दुसरी CD आपोआप सुरु होण्यापासून थांबवायचे असल्यास ती CD कॉम्प्युटरमध्ये टाकल्यावर काही सेकंद कि-बोर्ड वरील Shift हे बटन दाबून धरावे.

#vksborde

Sunday, 12 November 2017

महालाभार्थी वेबपोर्टल

शासनाच्या विविध योजनांच्या लाभांची माहिती आता व्यक्तिअनुरुप स्वरूपात
माननीय मुख्यमंत्री श्री. देवेंद्रजी फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र शासनाच्या मुख्यमंत्री कार्यालयाने आजपर्यंत अनेक लोकउपयुक्त उपक्रम यशस्वीपणे व पारदर्शीपणे राबविले आहेत. त्यांच्या डिजिटल महाराष्ट्र या व्हिजनअंतर्गतनागरिकांना वैयक्तिकरित्या मदत करणाऱ्या ‘महालाभार्थी’ या एका पथदर्शी उपक्रमाचे मुख्यमंत्री कार्यालय आणि महाराष्ट्र ज्ञान महामंडळ अर्थात MKCL यांच्या संयुक्त विद्यमाने आज मा. मुख्यमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण केले गेले.
       शासनाच्या विविध कल्याणकारी योजनांपैकी नागरिक कोणत्या योजनांना पात्र होऊ शकतात याची माहिती नागरिकांना व्यक्तिअनुरुप स्वरूपात उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने ‘एमकेसीएल’ च्या मदतीने ‘महालाभार्थी’ या संकेतस्थळाची निर्मिती करण्यात आलेली आहे.
       यासुविधेचा लाभ घेण्यासाठी नागरिकांनी प्रथम cmo.maharashtra.gov.in किंवा www.mahalabharthi.in या संकेतस्थळावरील ‘महालाभार्थी’ लोगोवर क्लिक करून ‘महालाभार्थी’ या पोर्टलवर जावे. तेथे आवश्यक ती माहिती भरून प्रथम नोंदणी करून  लॉगीन करावे. आपली थोडक्यात माहिती भरावी. त्या माहितीच्या आधारे ज्याला नागरिक पात्र होऊ शकतात केवळ अशाच निवडक योजनांची माहिती हे पोर्टल देणार आहे.
#vksborde
 

गीता मद्धे म्हंटलं आहे कि - ”ज्ञानात ऋते न मुक्ति” अर्थात् ज्ञाना  शिवाय  मुक्ति सम्भव नही । ज्ञान मिळविण्याचे मुख्यत: दोन मार्ग आहे सत्संगति आणि स्वाध्याय. आज ज्या पद्धतीने नवीन पिढी  सोशल मीडियाच्या आहारी गेली आहेत त्यामुळे येणार्‍या काळात त्यांचे फार मोठे बौद्धिक नुकसान होणार आहे आणि होत आहे. पुस्तक वाचनामुळे होणारे फायद्दे आणि त्यामधून मिळणारी Positive ऊर्जा याचे महत्व त्यांना पटवून सांगण्याची अत्यंत अवशक्ता निर्माण झालेली आहे. विद्यार्थ्यांना वाचनाची गोडी निर्माण व्हावी या उद्देशाने आमचे मित्र संकल्प एजुकेशन औरंगाबाद चे संचालक श्री राहुल मिसाळ यांनी न्यू हायस्कूल भोकरदन शाळेला काही चांगली पुस्तके भेट दिली.  

न्यू हायस्कूल भोकरदन चे मुख्याध्यापक श्री भालेराव सर यांना पुस्तकांची भेट देतांना आयकॉन कॉम्प्युटर्स चे संचालक विकास पाटील बोर्डे, याप्रसंगी उपस्थित भोकरदन पोलिस ठाण्याचे निरीक्षक श्री रेंगे साहेब, श्री राहुल मिसाळ व शिक्षक वृंद   

Friday, 10 November 2017

हात मदतीचा

एक सामाजिक कर्तव्य म्हणून आत्महत्या केलेल्या शेतकर्‍यांच्या मुलांना आयकॉन कॉम्प्युटर्सचा मदतीचा हात. 



Thursday, 9 November 2017

Accounting with Tally ERP 9


Accounting क्षेत्रात आज खूप जास्त प्रमाणात रोजगाराच्या संधी उपलब्ध झालेल्या आहेत. बॅंकिंग क्षेत्र, कपन्यांचे अकाऊंट सेक्शन यामद्धे काम मिळविण्यासाठी आवश्यकता आहे ती Tally ERP 9 सारख्या कोर्सेची.


Tally ERP 9 कोर्स 


कालावधी : 3 महीने (रोज 1 तास प्रॅक्टिकल)
फीस : एका हप्त्यात : 3200    दोन हप्त्यात : 1800 + 1800 = 3600

Join Course

भोकरदन तालुक्यातील दर्जेदार संगणक प्रशिक्षण देणारी सर्वोत्कृष्ट संगणक संस्था म्हणून आयकॉन कॉम्प्युटर्स चा उल्लेख केला जातो. एमकेसीएल आणि MCED चे दरवर्षी मिळणारे विभागीय तसेच जिल्हास्थरिय पुरस्कार आणि विद्यार्थ्यांचा मिळणारा प्रतिसाद व पालकांचा आमच्यावर असणारा विश्वास आयकॉन कॉम्प्युटर्सचा गौरव विशद करण्यासाठी पुरेसा आहे. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना "संगणकाचे दर्जेदार प्रशिक्षण" हाच आमचा ध्यास आहे आणि आमचे ब्रीदवाक्य ही.............!!
#vksborde